Rajya Sabha candidate : दिग्गजांना थांगपत्ताही नाही, महिला नेत्यानं मिळवलं राज्यसभेचं तिकीट

Rajanand More

मिनाक्षी नटराजन

काँग्रेस नेत्या मिनाक्षी नटराजन यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विश्वासू नेत्यांच्या गटातील मानल्या जातात.

Meenakshi Natarajan | Sarkarnama

वादाची ठिणगी

नटराजन यांच्या उमेदवारीमुळे मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना उमेदवारी दिली जावी, अशी मागणी होत होती.

Congress | Sarkarnama

दिग्विजय सिंह

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांची मुदत संपल्याने ही जागा रिक्त होत आहे. त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते.

Meenakshi Natarajan | Sarkarnama

वादग्रस्त विधान

दिग्विजय सिंह यांनीच नटराजन यांच्याविषयी सौ टका टंच माल असे विधान केले होते. शंभर टक्के शुध्द, असे सांगत खुलासाही केला होता. त्यावर आपले कौतुक केल्याचे नटराजन म्हणाल्या होत्या.

Meenakshi Natarajan | Sarkarnama

साधे राहणीमान

नटराजन या गांधीवादी विचारांच्या नेत्या असून अत्यंत साधे राहणीमान ही त्यांची ओळख आहे. सिंह यांनीही त्यांना शुभेच्छा देताना त्याचा उल्लेख केला.

Meenakshi Natarajan | Sarkarnama

माजी खासदार

मध्य प्रदेशातील मंदसौर लोकसभा मतदारसंघाच्या त्या २००९ ते २०१४ या कालावधीत खासदार होत्या. त्यानंतर पुढच्या दोन निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला.

Meenakshi Natarajan | Sarkarnama

राष्ट्रीय अध्यक्ष

विद्यार्थी दशेपासून काँग्रेसमध्ये असलेल्या नटराजन या NSUI च्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. तसेच युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.

Meenakshi Natarajan | Sarkarnama

राहुल गांधींच्या विश्वासू

राहुल गांधी यांच्या विश्वासू नेत्या म्हणून नटराजन यांची ओळख असून सध्या त्या तेलंगणाच्या प्रभारी आहेत. संघटन पातळीवरही त्या महत्वाची भूमिका पार पाडत आहेत.

Meenakshi Natarajan | Sarkarnama

NEXT : तब्बल 7 वर्षांनंतर IPS अधिकाऱ्याच्या स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग मोकळा; थेट केंद्राला 'सुप्रीम' आदेश

येथे क्लिक करा.