IPS Vijay Sakhare : दिल्ली बॉम्बस्फोटाचा तपास करणारा 'मराठी वाघ'! IPS विजय साखरे यांचे महाराष्ट्र 'कनेक्शन'

Rashmi Mane

ऐतिहासिक लाल किल्ला

दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

Delhi Car Blast

स्फोटप्रकरणी

आता या स्फोटप्रकरणी तपासासाठी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कडून 10 सदस्यीय विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

Delhi Car Blast

आयपीएस अधिकारी

या पथकाचे नेतृत्व एडीजी विजय साखरे हे करतील. विजय साखरे हे केरल कॅडरचे 1996 च्या तुकडीतील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत.

Delhi Car Blast

अतिरिक्त महासंचालक

2022 साली त्यांची NIA मध्ये आयजी म्हणून पाच वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर नेमणूक झाली होती. अलीकडेच, त्यांना NIAचे अतिरिक्त महासंचालक (ADG) म्हणून दोन वर्षांसाठी बढती देण्यात आली आहे.

IPS Vijay Sakhare

प्रामाणिक अधिकारी

विजय साखरे हे प्रामाणिक, व्यावसायिक आणि कुशल तपास अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांच्या तपासाचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये संगठित गुन्हेगारी, खून आणि दहशतवादी प्रकरणांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

NIA मध्ये येण्यापूर्वी ते केरल पोलीस दलात कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त महासंचालक (ADGP) म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी कोची शहराचे पोलीस आयुक्त आणि क्राईम ब्रँचचे प्रमुख अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिकदृष्ट्या देखील साखरे अत्यंत पात्र अधिकारी मानले जातात. त्यांनी नागपूरच्या व्हीएनआयटी (VNIT) मधून बी.टेक, तर आयआयटी दिल्ली मधून एम.टेक पदवी प्राप्त केली आहे.

अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स

नंतर त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स केले. कामाबरोबरच त्यांना टेनिस, क्रिकेट आणि पर्वतारोहणाची आवड आहे

Next : बॉम्बस्फोटाने हादरलेला लाल किल्ला कोणी आणि कधी बांधला? ताजमहालशी काय आहे खास कनेक्शन

येथे क्लिक करा