Jagdish Patil
देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या शेजारी असलेल्या मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी भयानक स्फोट झाला. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला.
या स्फोटानंतर 'लाल किल्ला' चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर या किल्ल्याबाबतची माहिती जाणून घेऊया.
लाल किल्ला भारताची राजधानी दिल्ली येथे असून तो मुघल सम्राट शाहजहानने बांधला होता.
शाहजहानने आपली राजधानी आग्र्याहून दिल्लीला हलवल्यानंतर या किल्ल्याचे बांधकाम सुरू केले.
नवी राजधानी शाहजहानाबादचे शाही निवासस्थान म्हणून हा किल्ला बांधला.
या किल्ल्याचे बांधकाम 1638 साली सुरू झाले ते 1648 साली पूर्ण झाले.
हा किल्ला लाल (बलुआ) दगडापासून बांधला म्हणून त्याचे नाव 'लाल किल्ला' असे पडले.
या किल्ल्याचं डिझाइन उस्ताद अहमद लाहौरी यांनी केलंलं. महत्वाची बाब म्हणजे लाहौरी यांनीच ताजमहालाचं डिझाइन केलं आहे.
लाल किल्ला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळात समाविष्ट आहे.