Rashmi Mane
मध्यरात्री क्लब्स, दारूचे ठेके आणि नाक्यांवर अचानक छापेमारी करत धडक कारवाई करणाऱ्या DCP सृष्टि गुप्ता.
सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करणे आणि गुन्हेगारीचे मूळ उखडून टाकणे हा गुप्ता यांचा मूळ उद्देश आहे.
सृष्टि गुप्ता मूळच्या दिल्लीच्या असून त्यांनी डीपीएस वसंत कुंज येथून शिक्षण घेतले आहे. 2011 मध्ये त्यांना शैक्षणिक गुणवत्तेसाठी गोल्ड मेडल मिळाले आहे,
2012 मध्ये JEE परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये B.Tech केलं.
पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी नोएडामधील कंपनीत ट्रेनिंग घेतली आणि त्यानंतर दिल्लीतील सिमा लॅब्समध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून सात महिने काम केले.
UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना 5 वर्षे लागली. त्यांनी 2020 मध्ये 171वी रँक मिळवून IPS सेवेसाठी निवड मिळवली.
अशा या धडाकेबाज DCP गुप्ता यांनी काल हरियाणाच्या पंचकुला येथील डीसीपी सृष्टी गुप्ता यांनी रात्री उशिरा क्लब, दारूची दुकाने आणि चेक पोस्टवर छापे टाकून खळबळ उडवली आहे.