Rashmi Mane
राज्यातील राजकारणात आणि ऊस उद्योगात चर्चेत असलेली संस्था म्हणजे वसंतराव नाईक साखर संशोधन संस्था (VSI). या संस्थेच्या कामकाजावर आता चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या चौकशीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुण्यातील मांजरी भागात असलेली VSI (Vasantdada Sugar Institute) ही संस्था महाराष्ट्रातील ऊस शेती आणि साखर उद्योगाच्या संशोधनासाठी कार्यरत आहे.
शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, अधिक उत्पादनक्षम ऊस जाती, जलसंधारण पद्धती आणि साखर उद्योगातील तांत्रिक सुधारणा याबाबत मार्गदर्शन देणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
देशभरातील साखर कारखान्यांना ऊस उत्पादनवाढीसाठी प्रशिक्षण देणे आणि संशोधनावर आधारित उपाय सुचवणे हेही VSI चे काम आहे.
दरवर्षी हजारो शेतकरी, कारखाना अधिकारी आणि विद्यार्थी या संस्थेत प्रशिक्षण घेतात. ऊसावर होणारे रोग, हवामानातील बदलांमुळे पिकावर होणारे परिणाम, तसेच पर्यावरणपूरक शेतीसाठी उपाय यावर संस्थेचे शास्त्रज्ञ काम करतात.
परंतु गेल्या काही दिवसांत या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांबाबत काही तक्रारी मिळाल्यामुळे शासनाने याबाबत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.