सरकारनामा ब्यूरो
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना एक भारतीय कामगार कायदा आणि सामाजिक सुरक्षा उपाय आहे.
या कायद्यानुसार स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान रोजगार दर दिला जातो.
कामासाठी अर्ज केल्यानंतर मजुरांना १५ दिवसांच्या आत मोफत जॉब कार्ड दिले जाते.
यामध्ये मजुरांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची नोंदणी करता येऊ शकते.
घराच्या ५ किलोमीटरच्या पुढील अंतरावर रोजगार पुरविण्यात आल्यास मजुरांना अतिरिक्त प्रवास भत्ता आणि उपजीविकेसाठी मजुरीच्या १०% जास्त रोजगार दर दिला जातो.
काम केल्यापासून १५ दिवसांच्या आत मजुरांची मजुरी त्यांच्या बँक खात्यात किंवा पोस्ट खात्यात जमा केली जाते.
अधिकाधिक मजुरांना लाभ मिळण्यासाठी या योजनेत केल्या जाणाऱ्या कामांसाठी कंत्राटदार आणि यंत्रसामुग्री वापरण्यास बंदी आहे.
ग्रामपंचायत स्तरावर ५०% खर्चाची विकासकामे या योजनेअंतर्गत करणे आवश्यक असते.
मजुरांना दुखापत झाल्यास रुग्णास मजुरीच्या ५०% रुग्ण भत्ता आणि अपंगत्व किंवा मृत्य झाल्यास रु. ५०,०००/- पर्यंत अनुदान व कुटूंब नियोजनासाठी सवलती देण्यात येतात.