MHADA Lottery 2025 : स्वप्नातील घर मिळवा म्हाडाच्या लॉटरीतून! जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप

Rashmi Mane

घराचं स्वप्न आता पूर्ण होणार!

सर्वसामान्य माणसासाठी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात घर घेणं अवघडच. पण म्हाडा कोकण मंडळाची 2025 ची लॉटरी घेऊन आली आहे हजारो घरांची सुवर्णसंधी!

Mhada Lottery 2025 | Sarkarnama

कुठे आहेत ही घरं?

5285 घरे आणि 77 भूखंड कोकण मंडळाच्या लॉटरीत उपलब्ध आहेत. ठाणे, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, नवी मुंबई, मिरारोड, पालघर आणि विरार या ठिकाणी ही घरे आहेत.

Mhada Lottery 2025 | Sarkarnama

सर्वात स्वस्त घर कुठे आणि कितीला?

या लॉटरीतील सर्वात स्वस्त घर कल्याण परिसरात आहे. किंमत फक्त 5.60 लाख रुपये!

Mhada Lottery 2025 | Sarkarnama

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन

म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन (https://housing.mhada.gov.in/) रजिस्ट्रेशन करा. मोबाईल नंबर, ईमेल टाकून अर्ज भरता येईल. ऑफलाइन अर्ज मान्य नाहीत.

Mhada Lottery 2025 | Sarkarnama

अर्ज भरण्याची पद्धत

रजिस्ट्रेशन करा, तुमचं प्रोफाइल भरा आणि हवे असलेला प्रकल्प निवडा. आवश्यक कागदपत्रं अपलोड करा, फी भरा आणि अर्ज सबमिट करा.

Mhada Lottery 2025 | Sarkarnama

कोणती कागदपत्रं लागतील?

  • आधार कार्ड (मोबाईल लिंक आवश्यक)

  • पॅन कार्ड

  • रहिवासी व अधिवास प्रमाणपत्र

  • कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला

  • जात प्रमाणपत्र (आरक्षितांसाठी)

Mhada Lottery 2025 | Sarkarnama

विशेष प्रवर्ग

कलाकार, पत्रकार, सरकारी कर्मचारी, माजी सैनिक, आमदार-खासदार यांच्यासाठी स्वतंत्र प्रमाणपत्रं लागतील. वेबसाइटवर नमुने उपलब्ध आहेत.

Mhada Lottery 2025 | Sarkarnama

Next : 'हे' काम न केल्यास 'या' लोकांचं आधार कार्ड होईल बंद, UIDAI ने केला अलर्ट जारी! 

येथे क्लिक करा