Roshan More
माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे गेले 55 वर्ष देवरा कुटुंबीयांचे काँग्रेससोबत असलेले नाते संपुष्टात आले.
इंडिया आघाडीत दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेकडे (ठाकरे गट) आहे. त्यामुळे काँग्रेसला ही जागा मिळणार नसल्याने देवरा यांनी राजीनामा दिल्याची शक्यता आहे.
मिलिंद देवरा हे काँग्रेसचे दिवंगत नेते आणि मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. मुरली देवरा हे काँग्रेसच्या काळात केंद्रात मंत्री होते. काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती.
मिलिंद देवरा डॉ.मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री होते.
2004 आणि 2009 असे सलग दोन टर्म मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबई मतदार संघातून विजय होत खासदार तसेच केंद्रीय राज्यमंत्री झाले.
2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत देवरा यांना शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातून मिलिंद देवरा यांनी बिझनेस व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आहे.
दक्षिण मुंबईची जागा ही शिवसेनेकडे (शिंदे गट) असण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवरा शिंदे गटात प्रवेश करतील, अशी शक्यता आहे.