Pradeep Pendhare
मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गिरणी कामगारांनी हक्काच्या घरांसाठी आज आंदोलन केले.
गिरणी कामगारांना हक्काच्या घरांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला.
गिरणी कामगारांनी मुंबईत 18 जानेवारी 1982 रोजी मध्ये पहिला आणि मोठा संप केला होता.
हा संप, वेतन आणि बोनससाठी सुरू झाला होता, कालांतराने घरांच्या हक्कांसाठी लढ्यात बदलला.
गेल्या 43 वर्षांपासून, म्हणजेच आजही, गिरणी कामगार आणि त्यांचे वारस त्यांच्या हक्काच्या घरासाठी संघर्ष करत आहेत.
मुंबईतील गिरण्यांचे मॉलमध्ये रूपांतरित झाले आहे आणि चाळींची जागा आता गगनचुंबी इमारतींनी घेतली आहे, पण गिरणी कामगारांचा संघर्ष सुरूच आहे.
गिरणी कामगार संघर्ष समिती आणि इतर संघटना या लढ्यात सक्रिय सहभागी असून, कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
गिरणी कामगारांनी त्यांची एकजूट आणि लढाऊ वृत्ती आजही जपली आहे, ज्यामुळे त्यांना त्यांचे हक्क मिळवण्यास मदत होईल.