इराणमध्ये 165 शाळकरी मुलींचं एकाच वेळी दफन; JCB ने खोदलेल्या कबरींचे फोटो पाहून जग हादरलं!

Jagdish Patil

मिनाब

इस्त्राईलने दक्षिण इराणमधील मिनाब शहरातील एका प्राथमिक शाळेवर भीषण हल्ला केला.

Minab school students funeral | Sarkarnama

निषेध

या हल्ल्यात तब्बल 165 शाळकरी विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचा जगभरातून निषेध केला जात आहे.

Minab school students funeral | Sarkarnama

दफन

तर काल मंगळवारी (ता.03) या सर्व विद्यार्थिनींना सामूहिकपणे दफन करण्यात आलं.

Minab school students funeral | Sarkarnama

जेसीबी

मृत मुलींची संख्या जास्त असल्याने त्यांची कबरी जेसीबीच्या साहाय्याने खोदली गेली.

Minab school students funeral | Sarkarnama

फोटो

एकाच रांगेत 165 कबरी खोदल्याचे फोटो पाहून संपूर्ण जग हादरलं आहे.

Minab school students funeral | Sarkarnama

अंत्यसंस्कार

मुलींच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोक जमले होते. यावेळी मृत मुलींच्या पालकांच्या वेदना अनेकांना पाहवत नव्हत्या.

Minab school students funeral | Sarkarnama

घोषणा

यावेळी उपस्थित नागरिकांनी 'डेथ टू अमेरिका', 'डेथ टू इस्त्राईल' आणि 'नो सरेंडर' अशा घोषणा दिल्या.

Minab school students funeral | Sarkarnama

कुटुंबीय

अंत्यसंस्कारा वेळी मृत मुलींचे आई वडील आणि कुटुंबीय त्यांचे फोटो घेऊन आले होते.

Minab school students funeral | Sarkarnama

इस्त्राइल

आंतरराष्ट्रीय पातळीवरून टीका होताच इस्त्राइल लष्कराने आम्हाला या हल्ल्याबाबत कल्पना नव्हती, असा दावा केला आहे.

Minab school students funeral | Sarkarnama

इराण

मात्र, अमेरिका, इस्त्राईल सातत्याने निवासी भागाला लक्ष्य करत असल्याचा आरोप इराणचे परराष्ट्रमंत्र्यांनी केला आहे.

Minab school students funeral | Sarkarnama

NEXT : जगाची पसंती असलेल्या दुबईची वाताहत; पर्यटकांसह संपूर्ण जगाला हादरवणारे हल्ल्याचे भयानक PHOTOS

Iran Israel War | Dubai Attack | Sarkarnama
क्लिक करा