Aslam Shanedivan
राज्यातील महिलांना आर्थिक आधार मिळावा, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात, यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात प्रति महिना जमा केले जातात.
दरम्यान खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत लाभ जावा यासाठी e-KYC ची अट घालण्यात आली होती. ज्याची डेडलाईन ३१ डिसेंबर होती.
यानंतर लाखो लाडक्या बहिणींनी e-KYC केली मात्र काही ठिकाणी ऑपशन चुकल्याने त्यांचा लाभ बंद झाला आहे.
पण आता महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून लाडक्या बहिणींसाठी विशेष हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.
राज्य सरकारने आता 181 हा विशेष महिला हेल्पलाईन नंबर सुरू केला असून याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स पोस्ट करत दिली आहे.
ज्यात त्यांनी, e-KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाला आहे. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
या व योजनेशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी या हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली असून सर्व लाडक्या बहिणींनी या सुविधेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.