Akshay Sabale
भाजपचे दिवंगत नेते, प्रमोद महाजन यांनी विधानसभा निवडणूक, कशी लढायला लावली याचा किस्सा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितला आहे.
गिरीश महाजन म्हणाले, माझी पहिलीच विधानसभा निवडणूक होती.
माझ्या विरोधात शरद पवार यांचे विश्वासू ईश्वरलाल जैन उभे होते. तेव्हा प्रमोद महाजन यांनी मला निवडणूक लढायला सांगितलं.
मी निवडणूक लढणार नाही, असं प्रमोद महाजन यांना कळवलं. पण, त्यांनी निवडणूक लढावी लागेल आणि तू जिंकणार असल्याचं मला सांगितलं.
मी प्रमोद महाजन यांना म्हणालो, माझ्या खिशात पाच हजार रूपये सुद्धा नाहीत, कसं निवडणूक लढू. त्यावर महाजनांनी म्हटलं, तू काही कर.. वर्गणी गोळा कर.. भिक माग...
त्यानंतर पाच-साडेपाच लाख रूपये वर्गणी गोळा झाली. मी निवडणूक लढतो. या निवडणुकीत 14 हजार मतांनी मी निवडून आलो.
girish mahajan
तेव्हापासून आजपर्यंत मी कधी मागे वळून पाहिलं नाही, असं महाजन यांनी जळगावातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं आहे.