Vijaykumar Dudhale
एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी सातारा जिल्ह्याच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे या गावी झाला.
एकनाथ शिंदे यांनी अकरावीपर्यंतचे शिक्षण मंगला हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, ठाणे येथे केले. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी शाळा सोडून रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 2020 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली.
डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे 28 मार्च 2023 रोजी राज्यपाल रमेश बैस आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांना डी. लिट. पदवी प्रदान करण्यात आली.
शिंदे यांना 1980 च्या सुरुवातीस तत्कालीन ठाणे शिवसेना प्रमुख आनंद दिघे यांनी राजकारणात आणले. ते 1984 मध्ये ते ठाण्यात शाखाप्रमुख बनले.
एकनाथ शिंदे हे 1997 मध्ये ठाणे महापालिकेत प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आले. ठाणे महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदासाठी 2001 मध्ये त्यांची निवड झाली. ठाणे महापालिकेत ते 2002 मध्ये दुसऱ्यांदा निवडून आले.
एकनाथ शिंदे हे 2004 मध्ये प्रथमच विधानसभेत निवडून आले. ठाणे जिल्हाप्रमुखपदी त्यांची 2005 मध्ये निवड झाली.
ऑक्टोबर 2014 ते डिसेंबर 2014 च्या दरम्यान ते महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. शिंदे यांची 2018 मध्ये शिवसेना पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती
महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी ३० जून २०२२ रोजी शपथ घेतली.