Roshan More
उत्तर प्रदेशमध्ये सरकार मोठी की पक्ष संघटन याच्यावरून वाद सुरू आहे.
राज्य मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या किन्नर कल्याण बोर्डच्या उपाध्यक्ष सोनम किन्नर यांनी आपला राजीनामा दिला आहे.
सरकारपेक्षा पक्ष संघटन मोठे आहे, असे सोनम म्हणाल्या.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे अनेकदा तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याची सोनम यांची टीका
सोनम यांनी राजीनामा दिला असला तरी तो अजूनही स्वीकारण्यात आलेला नाही.
सोनम यांनी अधिकारी आपले ऐकत नसल्याचे सांगितले तसेच कार्यकर्त्यांना खोट्या आरोपात अडकवण्याची धमकी देत असल्याचा आरोप केला.
लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी कोणी घेत नसल्याने आपण ती स्वीकारत राजीनामा देत आहे, असे देखील सोनम यांनी सांगितले.
सोनम यांनी आपण राजीनामा दिला असून संघटनेमध्ये काम करणार असल्याचे म्हटले आहे.
Ajit Pawar : गुलाबी जॅकेट आणि..., बारामतीच्या दादांचा रुबाबच लय भारी! शिवले 12 जॅकेट