Mangesh Mahale
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून Intelligence Bureau मध्ये (ACIO) Grade-II/Executive पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, जी 10 ऑगस्ट 2025 पर्यंत सुरू राहणार आहे.
IB ACIO परीक्षा ही गृह मंत्रालय (MHA) द्वारे आयोजित करण्यात येणारी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे.
Intelligence Bureau (IB) मध्ये या पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी घेतली जाते.
या वर्षी MHA ने IB ACIO भरती पदासाठी 3 हजार 717 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
IB ACIO भरती 2025 ची सविस्तर अधिसूचना www.mha.gov.in वर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
परीक्षेची संपूर्ण माहिती यात समाविष्ट आहे. हे पद General Central Service, Group ‘C’ (Non-Gazetted, Non-Ministerial) श्रेणीत येते.
निवड प्रक्रिया टप्पा 1 (Tier 1), टप्पा 2 (Tier 2) आणि मुलाखत (Interview) अशा विविध टप्प्यांमधून जाणार आहे.
सातव्या केंद्रीय वेतन आयोगानुसार Level 7 (₹44,900 – ₹1,42,400) वेतनश्रेणीसह केंद्र सरकारच्या इतर सवलतींचाही समावेश आहे.