Rajanand More
जोहरान हे भारतीय वंशाचे अमेरिकेतील राजकारणी आहेत. न्यूयॉर्क महापौर पदाच्या निवडणूकीत डेमोक्रेटिक पक्षाचे ते उमेदवार आहेत.
प्रसिध्द दिग्दर्शक मीरा नायर या जोहरान यांच्या आई आहेत. नायर यांच्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे.
जोहरान यांचे वडील मेहमूद जोहरान हे लेखक असून मुळचे गुजरातमधील आहे. त्यामुळे जोहरान यांची उमेदवारी चर्चेत आली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीच्या वादग्रस्त विधानाचा जोहरान यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
गुजरात दंगलीच्या मुद्द्यावरून जोहरान यांनी मोदींच्या सांगण्यावरून मुस्लिमांचा नरसंहार झाल्याचे गंभीर विधान केले आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतासह अमेरिकेतही खळबळ उडाली आहे. यूएसमधील प्रवासी भारतीयांनी तीव्र निषेध केला असून भारतातही टीका होऊ लागली आहे.
ते भारतविरोधी असल्याची टीका होत आहे. त्यांची अनेक जुनी ट्विट आणि व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. अनेक नेत्यांनीही त्यावरून ममदानी यांच्यावर टीका केली आहे.
जोहरान यांचा जन्म युगांडामधील आहे. ते वयाच्या सातव्या वर्षी अमेरिकेत आले आणि 2018 मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व घेतले. त्यांचे वय केवळ 33 वर्षे एवढे आहे.