Jagdish Patil
मिराया वाड्रा ही काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांची मुलगी तर राहुल गांधी यांची भाची आहे.
मिराया वाड्रा यांनी ब्रिटनमधून पदवीचं शिक्षण पुर्ण केलं आहे.
पदवी मिळवताच पदवीदान समारंभात मिराया यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते.
राहुल गांधी हे देखील भाचीच्या आनंदात सहभागी झाले.
यासाठी त्यांनी स्कॉटलंडमधील सेंट अँड्र्यूज येथील मिराया यांच्या पदवीदान समारंभाला हजेरी लावली
मिराया या सोशल मीडियापासून लांब असतात. मात्र, 2024 च्या भारत जोडो यात्रेत त्यांनी मामा राहुल गांधी यांच्यासोबत हातात हात घालून चालत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
तसंच मिराया 2016 मध्ये प्रथम चर्चेत आल्या जेव्हा तिने हरियाणा मुलींच्या संघात बास्केटबॉल चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता.