Jagdish Patil
पंतप्रधान नरेंद्र मोदीं घाना देशाच्या दौऱ्यावर गेले असताना अक्रा आंतरराष्ट्रीय विमानतळार मोदींना 21 तोफांची सलामी देत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आलं.
घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांनी मोदींना घाना देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मोदींना दिला.
पंतप्रधान मोदींना आतापर्यंत अमेरिका, फ्रान्स, रशिया, सौदी अरेबिया, ग्रीस, कुवेत, युएई सारख्या 24 देशांनी सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे.
सौदी अरेबियाने 'ऑर्डर ऑफ द अब्दुल अजीज' आणि अफगाणिस्तानने 'ऑर्डर ऑफ अमानुल्ला खान' तर पॅलेस्टाईनने 'ऑर्डर ऑफ पॅलेस्टाईन स्टेट' पुरस्कार मोदींना दिला आहे.
परदेशी मान्यवरांना दिला जाणारा मालदीवचा 'ऑर्डर ऑफ इज्जुद्दीन' तर संयुक्त अरब अमिरातीचा 'ऑर्डर ऑफ झायेद' तसंच बहरीनच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने मोदींचा सन्मान करण्यात आला आहे.
अमेरिकेने लीजन ऑफ मेरिट देत PM मोदींना सन्मानित केलं. तर फिजीचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ फिजी आणि पापुआ न्यू गिनीचा ऑर्डर ऑफ लोगोहू हे पुरस्कार मोदींना देण्यात आले आहे.
इजिप्तने 'ऑर्डर ऑफ द नाईल' तर ग्रीसने ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मोदींना दिले आहेत.
फ्रान्सने 'लीजन ऑफ द लायन', भूतानने 'ऑर्डर ऑफ द तुक ग्याल्पो' आणि रशियाने 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल' हा पुरस्कार दिले आहेत.
नायजेरियाने 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर', डोमिनिकाचा 'डोमिनिका' पुरस्कार आणि गयानाने मानद सदस्य पुरस्कार देऊन मोदींचा सन्मान केला आहे.
कुवेतने टऑर्डर ऑफ द ग्रेट मुबारकट तर बार्बाडोसनेही सर्वोच्च नागरी पुरस्कार देत मोदींचा सन्मान केला. मॉरिशसने 'ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन' हा पुरस्कार दिला आहे.
श्रीलंकेने त्यांच्या देशातील सर्वोच्च सन्मान मित्र विभूषण देऊन मोदींचा सन्मान केला आहे.