Rashmi Mane
आजकाल बहुतेक लोक होम लोन, कार लोन किंवा पर्सनल लोन घेतात. पण अचानक परिस्थिती बदलली तर EMI भरणं कठीण होतं. अशावेळी टेन्शन वाढतं, पण घाबरण्याची गरज नाही.
नोकरी जाणे, सॅलरी कमी होणे, व्यवसायात नुकसान किंवा मेडिकल इमर्जन्सीमुळे आर्थिक अडचण येते. त्यामुळे वेळेवर EMI भरणं शक्य होत नाही.
नाही! EMI न भरल्यावर बँक लगेच घर किंवा गाडी जप्त करत नाही. त्यासाठी ठरलेली कायदेशीर प्रक्रिया असते.
जर 2-3 महिने EMI भरली नाही तर लोन अकाउंट NPA घोषित होतं. म्हणजे तुमचं लोन ‘डिफॉल्ट’ मध्ये गेलं, पण लगेच कठोर कारवाई होत नाही.
सर्वप्रथम बँक नोटीस पाठवते आणि साधारण 60 दिवसांचा वेळ देते. त्यानंतर कॉल किंवा ईमेलद्वारे संपर्क केला जातो आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न होतो.
बँक नोटीसशिवाय मालमत्ता जप्त करू शकत नाही. धमकी देणं, त्रास देणं किंवा जेलमध्ये टाकणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
बँकेशी बोला, EMI कमी करून घ्या, लोन रिस्ट्रक्चर करा किंवा काही काळासाठी मोरेटोरियम घ्या. गरज असल्यास वन टाइम सेटलमेंट (OTS) हा पर्यायही आहे.
पळून जाणं किंवा टाळणं योग्य नाही. बँकेशी स्पष्ट बोला आणि लेखी तोडगा काढा. शांत राहून योग्य निर्णय घेतला तर परिस्थिती सहज हाताळता येते.