Rashmi Mane
1 एप्रिलपासून आयटीआर फाइलिंगला सुरुवात झाली आहे. यंदा काही कारणास्तव ही प्रक्रिया उशिरा सुरू झाली असली तरी आता ती पूर्ण क्षमतेने सुरू आहे.
आता तुम्ही 15 सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचा आयकर रिटर्न फाइल करू शकता. ही डेडलाइन सरकारने वाढवली आहे.
आयटीआर फाइल करताना तुमचे उत्पन्न, गुंतवणूक, टॅक्स डिडक्शन यासारख्या गोष्टींची माहिती तयार ठेवा.
जर तुम्ही दिलेल्या मुदतीनंतर आयटीआर फाइल केला, तर दंड आणि व्याज भरावा लागू शकतो.
उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर 5000 दंड
उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असेल तर 1000 दंड
(कलम 234F नुसार)
अनपेड टॅक्सवर दर महिन्याला 1% व्याज लागू होतं. त्यामुळे उशीर टाळणं केव्हाही फायद्याचं!
जर तुम्ही वेळेत फाइल करू शकलात नाही, तर तुम्ही बिलेटेड ITR 31 डिसेंबर 2025 पर्यंत भरू शकता. पण दंड लागणारच!
तुमचं उत्पन्न, व्यवसाय किंवा नोकरी यानुसार ITR फॉर्म निवडा – उदा. ITR-1, ITR-2 इत्यादी.