संकटात सापडलेल्या मुलांना सरकार देतंय दरमहा 4 हजार रुपये; जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ!

Pradeep Pendhare

योजना काय आहे?

मिशन वात्सल्य ही केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाची योजना असून, संकटग्रस्त आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांना लाभ मिळतो.

Mission Vatsalya | Sarkarnama

लाभार्थी कोण

अनाथ मुले आणि नातेवाईकांकडे राहणारी, विधवा, बालमजुरी, बालविवाह, तस्करी किंवा शोषणातील, घटस्फोटितांची, आई-वडील गंभीर आजाराने ग्रस्त, शारीरिकदृष्ट्या संगोपन करण्यास असमर्थ असलेली मुलांना लाभ मिळतो.

Mission Vatsalya | Sarkarnama

कुटुंब उत्पन्न किती?

केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ग्रामीण भागातील वार्षिक उत्पन्न 72 हजार, तर इतर भागातील वार्षिक उत्पन्न 96 हजार रुपयांपर्यंत असावे लागते.

Mission Vatsalya | Sarkarnama

4 हजार मिळतात

मुलांचे संगोपन, शिक्षण, आरोग्य आणि पोषण गरजा भागवण्यासाठी प्रति लाभार्थी मुलाच्या बँक खात्यात दरमहा चार हजार रुपयांची रक्कम जमा होते.

Mission Vatsalya | Sarkarnama

अर्ज कसा करायचा?

लाभ मिळवण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे अर्ज करता येतो. प्रकरण बाल कल्याण समितीच्या प्रक्रियेनंतर जिल्हास्तरीय कमिटीकडून शिफारस व मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होते.

Mission Vatsalya | Sarkarnama

कोणती कागदपत्रे?

मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड, रहिवासी आणि उत्पन्नाचा पुरावा, आई-वडिलांच्या परिस्थितीचा पुरावा किंवा शाळेचा दाखला आणि बँक खात्याचा तपशील, अशी कागदपत्रे आवश्यक असतात.

Mission Vatsalya | Sarkarnama

मंजुरी कोण देतं?

जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून तपासणी, जिल्हास्तरीय समितीकडून पात्रतेचा आढावा, जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरीनंतर मुलाच्या खात्यात आर्थिक मदत जमा होते.

Mission Vatsalya | Sarkarnama

किती वर्षांपर्यंत मदत?

स्पॉन्सरशिपचा लाभ साधारणतः वयाच्या 18 वर्षांपर्यंत मिळतो. प्रकरणानुसार मदतीचा कालावधी निश्चित करून, मुलाचे शिक्षण आणि संगोपन यांचा नियमित आढावा घेतला जातो.

Mission Vatsalya | Sarkarnama

कुठे संपर्क साधाल?

जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती आणि संकटात असलेल्या मुलांसाठी चाइल्ड हेल्पलाइन 1098 येथे संपर्क साधता येईल.

Mission Vatsalya | Sarkarnama

NEXT : महिलांना व्यवसायासाठी मिळू शकते सरकारी मदत

येथे क्लिक करा :