Rashmi Mane
जर तुमचं पॅनकार्ड ‘इनअॅक्टिव्ह’ असूनही वापरत असाल, तर 10,000 रुपये दंड भरावा लागू शकतो!
पॅनकार्ड केवळ आयकर भरायला नव्हे, तर बँक व्यवहार, प्रॉपर्टी खरेदी, गुंतवणूक, कर्ज
यासाठीही आवश्यक आहे.
इनअॅक्टिव्ह पॅनकार्ड वापरल्यास आयकर विभाग कलम 272B अंतर्गत
10,000 रुपये दंड लावू शकतो.
जर पॅनकार्ड आधारशी लिंक नसल्यास, ते इनअॅक्टिव्ह मानलं जातं. सरकारने ही लिंकिंग अनिवार्य केली आहे.
याची माहिती मिळवण्यासाठी e-filing portal ला भेट द्या. 'Verify Your PAN' वर क्लिक करा आणि माहिती भरा व OTP टाका.
पॅनकार्ड इनअॅक्टिव्ह असेल, तर तातडीने आधारकार्डशी लिंक करा. विलंब केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं.
आधी लिंक केलं असेल, तरी एकदा पडताळणी करा. सिस्टममध्ये अपडेट झालंय का, हे तपासा.
तुमच्याकडे दोन पॅनकार्ड असेल, तर एक कार्ड तातडीने आयकर विभागाकडे सरेंडर करा. दंड टाळण्यासाठी ही आवश्यक पावलं आहे.