सरकारनामा ब्यूरो
भोसरीचे आमदार महेश लांडगे शालेय जीवनापासून कुस्तीसारख्या पारंपरिक खेळामध्ये सक्रिय आहेत.
नगरसेवक ते आमदारपदापर्यंतचा यशस्वी प्रवास पूर्ण करणारे आमदार महेश लांडगे यांचा फिटनेस युवकांसाठी प्रेरणादायी आहे.
आमदार म्हणून व्यग्र दिनचर्या असतानाही दररोज सकाळी ५.३० वाजता उठून व्यायाम करणं हा त्यांच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग आहे.
शालेय जीवनात त्यांनी कोल्हापूर येथील तालमीमध्ये सराव केला आहे. तेव्हापासून त्यांची ‘पैलवान’ अशीच ओळख आहे.
भोसरीमध्ये भरवण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांमुळे लांडगे यांच्या राजकीय व सामाजिक जीवनाला नवीन दिशा मिळाली.
जिममध्ये चार किलोमीटर धावणे, जोर, बैठका, सायकलिंग, वेट ट्रेनिंग व्यायामांचा ते सातत्याने सराव करतात.
रविवारी दिघीच्या डोंगरावर चढणे, आणि वेळ मिळेल तेव्हा पोहणे हे त्यांच्या फिटनेस रुटीनचे वैशिष्ट्य आहे.
मोकळ्या वातावरणात राहणे आणि गाई-गुरांच्या सानिध्यात सकारात्मक ऊर्जा मिळवणे, यावर नेहमीच त्यांचा भर असतो.