Amol Sutar
डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1987 रोजी मुंबई येथे झाला.
डॉ. श्रीकांत शिंदे हे एक वैद्यकीय व्यवसायी आहेत. त्यांचे शिक्षण MBBS त्यानंतर MS ऑर्थोपेडिक्स झाले असून डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, नवी मुंबई येथून त्यांनी MS पूर्ण केले .
डॉ. श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते सुपुत्र आहेत.
डॉ. श्रीकांत शिंदे पहिल्यांदा 2014 च्या निवडणुकीत शिवसेना पक्षातून कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.
ते आतापर्यंतचे सर्वात तरुण मराठा खासदार ठरले, तेव्हा ते अवघ्या 27 वर्षांचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांचा 2.50 लाख मतांच्या फरकाने पराभव केला.
मे 2019 मध्ये त्यांनी त्याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. यावेळी ते 17व्या लोकसभेसाठी शिवसेना पक्षातूनच निवडून आले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना 17व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी 'संसदरत्न' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो.
राजकरणात येण्याआधी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कळवा येथील शिवाजी हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून दोन वर्षे प्रॅक्टिस केली.
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये त्यांचे वडील एकनाथ शिंदे, आई लता, पत्नी वृषाली आणि मुलगा रुद्रांश यांचा समावेश आहे.