Akshay Sabale
मनसे नेते, सिनेलेखक आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानिमित्त पानसे कोण आहेत जाणून घेऊया?
शिवसेनेत असताना विद्यार्थी सेनेची धुरा अभिजीत पानसेंच्या खांद्यावर होती. पण, आदित्य ठाकरेंच्या लॉन्चिंगसाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युवासेनेची स्थापन केली.
विद्यार्थी सेनेचं विलीनीकरण युवासेनेत झालं. मग, नाराज झालेल्या पानसेंनी मनसेला साथ दिली.
पानसेंनी रेगे, ठाकरेसारख्या सिनेमांचं दिग्दर्शित केला आहे. त्यासह रानबाजार ही वेबसीरीजचे दिग्दर्शनसुद्धा पानसेंनी केलं आहे.
अभिजीत पानसे सिनेमाव्यतिरिक्त राजकारणातही सक्रिय असतात. पानसेंनी मनसेच्या चित्रपट सेनेची जबाबदारी सांभाळलेली आहे.
राज ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. अभिजीत पानसेंनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती.