Roshan More
विधान परिषदेमध्ये क्राॅस वोटिंग सात आमदारांनी केल्याचे संशय काँग्रेसच्या नेत्यांना आहे.
काँग्रेसचे इगतपूरीचे आमदार हिरामण कोसकर यांच्यावर क्राॅस वोटिंगचा संशय आहे. मात्र, आपण क्राॅस वोटिंग केले नसल्याचे स्पष्टीकरण कोसकर यांनी दिले आहे.
'क्रॉस वोटिंग' प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. याबाबत विनाकारण आपले नाव जोडण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. ते सहन करणार नाही," असा इशारा शिरीष चौधरी यांनी दिला आहे.
झिशान सिद्दीकी यांचे वडीलांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे त्यामुळे त्यांच्यावर क्राॅस वोटिंगचा संशय आहे. मात्र, काँग्रेस वरिष्ठांनी सांगितल्या प्रमाणे मतदान केल्याचे झिशान सिद्दीकी यांनी सांगितले.
मी सच्चा काँग्रेसी आहे. मी 'क्राॅस वोटिंग' केलेले नाही, तर पक्षाच्या आदेशानुसार मिलिंद नार्वेकर यांनाच मतदान केले, असे आमदार मोहन हंबर्डे म्हणाले आहेत.
माझे मत फुटलेले नाही, मी आजही काँग्रेस पक्षासोबतच आहे, असे सुलभा खोडके यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांचे समर्थक म्हणून जितेश अंतापूरकर हे परिचित आहेत. त्यामुळे त्यांच्यावर क्राॅस वोटिंगचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.