Deepak Kulkarni
मुंबई,पुणे,नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रभरात शुक्रवारी (ता.14) मोठ्या धुमधडाक्यात धुळवड साजरी केली जात आहे.
या धुळवडीचा आपल्या कुटुंबासह सेलिब्रेशन करत राजकीय नेत्यांनीही आनंद लुटला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी कुटुंबासोबत धुळवडीचा मनमुराद आनंद लुटला.
राज ठाकरे यांच्यासह पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे यांनी शिवतीर्थावर एकमेकांना रंग लावला.
यावेळी राज ठाकरेंचा वेगळा लूक पाहायला मिळाला. यावेळी ते नेहमीच्या लूकमध्ये नव्हते. टी-शर्टवर काळा गॉगल घातलेला दिसून आलं.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर संपूर्ण ठाकरे कुटुंब आणि मनसे कार्यकर्ते धुळवडीच्या रंगात न्हालेले दिसले.
अमित ठाकरेंनी शिवाजी पार्कात आलेल्या नागरिकांसोबतही धुळवड साजरी केली.
शर्मिला ठाकरे यांनी यावेळी राज ठाकरेंना रंग लावला.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधील शिवतीर्थ निवासस्थानी साजरी केलेल्या धुळवडीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.