Mangesh Mahale
विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता अजित पवार यांच्या घरात सनईचे सूर घुमणार आहे.
पवारांच्या घरी सुनबाई येणार, ही गुड न्यूज जय यांची आत्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे.
सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील हिच्यासोबत जय यांचा विवाह होणार आहे.
ऋतुजासह जय यांनी आजोबा शरद पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. त्यांना साखरपुड्याचं निमंत्रण दिले
पुण्यात 10 एप्रिल रोजी जय पवार यांचा साखरपुडा होणार आहे. डिसेंबरमध्ये लग्न होण्याची शक्यता आहे.
राजकारणापासून अद्याप दूर असलेले जय पवार उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत.
अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना पार्थ पवार आणि जय पवार अशी दोन मुलं आहेत.