Rashmi Mane
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शुक्रवारी एकत्र आल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
चर्चेला उधाण
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने चर्चेला उधाण आले आहे.
राज आणि उद्धव एकत्र आल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढणार का? अशा शंकाना तोंड फुटले आहे.
राजकीय हेतूसाठी नव्हे तर एका कौटुंबिक सोहळ्यासाठी एकत्र आले होते ठाकरे बंधू.
यावेळी क्लिक करण्यात आलेल्या फोटोमध्ये हे तिघेही एकत्र दिसून आले आहेत.
या फोटोंमध्ये उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील दिसत आहेत.
राज ठाकरेंची बहीण जयवंती आणि अभय देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडेच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं. मुंबईतील दादरमध्ये हा सोहळा पार पडला.