सरकारनामा ब्यूरो
मनसेचे अध्यक्ष आणि बेधडक नेते राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे.
शर्मिला ठाकरे आयुष्यात आल्यानंतर राज ठाकरे यांचे अवघे आयुष्य बदलून गेले.
अगदीच तरूण वयात लग्नाच्या बंधनात पडलेल्या दोघांचा आत्तापर्यंतचा प्रवास अतुट आणि अवर्णनीय आहे.
कॉलेजच्या कट्ट्यावरील ही भेट आयुष्यभरासाठी साथ देऊन गेली.
शर्मिला या राज यांच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या असूनही त्यांनी राज यांच्याशी विवाह केला.
कॉमन मित्राच्या माध्यमातून रुपारेल कॉलेजच्या कट्ट्यावर दोघांची पहिली भेट झाली आणि तेव्हापासूनच राज ठाकरेंना शर्मिला आवडू लागल्या.
पहिल्या भेटीनंतर काही दिवसांनी राज यांनी लग्नासाठी मागणी घातल्यावर दोघांनी लग्न केले, संसारात अनेक चढउतार आले पण दोघांनी एकमेकांना खंबीर साथ दिली.
राज यांचे काका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शर्मिला यांचे वडील या दोघांच्या घट्ट मैत्रीमुळे लग्नासाठी कोणतीही अडचण आली नाही.