Pradeep Pendhare
ऑक्टोबरमध्ये पहिला हप्ता दिल्यानंतर जानेवारी महिन्यात पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे नसतील.
सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील, तर त्याचा परिणाम राज्यावर होईल.
राज्य खड्ड्यात घातलं जात असेल, तर हे चुकीचं आहे. यावर कोणीतरी बोललं पाहिजे.
महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणले पाहिजे, रोजगार निर्मितीवर लक्ष दिले पाहिजे.
समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही, याकडं देखील राज ठाकरेंनी लक्ष वेधलं.
राज ठाकरे यांच्या या महत्त्वपूर्ण विधानांवर महायुतीकडून प्रत्युत्तर येवू लागलीत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज ठाकरेंना, 'आमच्या बहिणी स्वागत करत आहे', असल्याचं म्हटलं आहे.
'ज्यांच्या पोटात दुखतंय तेच, अशी वक्तव्य करतात', असेही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.