Mayur Ratnaparkhe
आयपीएस अधिकारी पराग जैन यांची दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (रॉ) चे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पराग जैन हे सध्याचे रॉ सचिव रवी सिन्हा यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपत आहे.
१९८९ च्या बॅचचे पंजाब कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत पराग जैन
जैन सध्या एव्हिएशन रिसर्च सेंटर (एआरसी) चे प्रमुख म्हणून काम करत आहेत.
पराग जैन हे एक अनुभवी अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी चंदीगडचे एसएसपी म्हणून काम केले आहे.
याशिवाय, पराग जैन यांनी कॅनडा आणि श्रीलंकेत राजनैतिक भूमिकांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.