Rashmi Mane
सरकारी योजनांमधील मोबाईल लिंक झाल्यामुळे पोलिसांना मोठी मदत मिळत आहे.
सरकारी योजनांशी जोडलेल्या मोबाईल नंबरमुळे पोलिसांनी अनेक बेपत्ता महिलांना शोधून काढले आहेत.
केंद्र व राज्यातील महिला, शेतकरी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजना आता पोलिस तपासातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आधारकार्डसोबत जोडलेला मोबाईल क्रमांक पोलिसांसाठी अत्यंत उपयोगी ठरत आहे.
सरकारी योजनेचा लाभ मिळणाऱ्या प्रत्येकाच्या मोबाईलवर व्यवहाराचे किंवा लाभाचे संदेश येतात. हा मोबाईल 'ऑन' होताच लोकेशन सायबर पोलिसांना मिळते आणि शोध लावणे सोपे होते.
सोलापूरमध्ये बेपत्ता झालेली एक महिला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची लाभार्थी होती. तिच्या लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरून लोकेशन मिळाले आणि पोलिसांनी तिला सुरक्षित शोधून काढले.
चोरी, घरफोडी, दरोडा, खून, बलात्कार असे गंभीर गुन्ह्यातील आरोपी मोबाईल बंद-चालू करत राहतात… पण बँक खाते, पॅन, आधार किंवा योजना खात्याशी लिंक नंबरमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे.
सायबर टीम, सीसीटीव्ही, फॉरेन्सिक आणि लिंक मोबाईल डेटाच्या मदतीने
90 टक्के प्रकरणांमध्ये त्वरित तपास पूर्ण होत आहे.
बेपत्ता महिला/तरुणी शोधताना “ती कोणत्या सरकारी योजनेची लाभार्थी आहे का?”
हे प्रथम तपासले जाते. कारण त्या योजनेतील मोबाईल लिंक तपासातून ठोस लोकेशन मिळते.