Rashmi Mane
नवी मुंबई पोलिसांची अभिनव कल्पनेला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे.
मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरापर्यंत मोबाईल नेणे बंदी, त्यामुळे मतदारांना अडचण होत होती. मात्र मुंबई पोलिसांनी नवीन कल्पला मांडली आहे.
मतदान केंद्रावर मोबाईल नेताना तो घेऊन तर जाऊ शकता पण मतदान केंद्रावर मोबाईल लॉकरमध्ये ठेवणे अनिवार्य असेल.
प्रत्येक लॉकरमध्ये 6-7 मोबाईल ठेवण्याची सुविधा, प्रत्येक स्लॉटची चावी मतदाराकडे.
मतदारांना मोबाईल न घेऊन येता येईल, सुरक्षा वाढेल आणि नियमही पाळले जातील.
केंद्रीय निवडणूक आयोगाने या योजनेला मान्यता दिली, मात्र अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनाकडे.
ओळखपत्र मिळण्याचा कालावधी 45 दिवसांपासून फक्त 15 दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
मतदारांना देण्यात येणाऱ्या स्लीपमध्ये भाग क्रमांक आणि यादी क्रमांक ठळक अक्षरात नमूद केले जाणार.
मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वात या योजनेचा यशस्वी प्रयोग, देशभरात याची अपेक्षा.