Beautiful IAS Officer: नजर लागेल असं सौंदर्य! 'या' आयएएस अधिकारी परराष्ट्र मंत्रालयात सांभाळतात मोठी जबाबदारी

सरकारनामा ब्यूरो

UPSC परीक्षा

UPSC परीक्षा क्रॅक करुन IAS आणि IPS अधिकारी होण्यासाठी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्राचा त्याग करून येतात.

Aishwarya Shyoran | Sarkarnama

ऐश्वर्या

अशीच एक माॅडेल आणि मिस इंडियाची फायनलिस्ट ऐश्वर्या श्योराण आहे. जिने पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करत यश मिळवले आहे.

Aishwarya Shyoran | Sarkarnama

राजस्थानच्या रहिवासी

राजस्थानच्या चुरू येथील रहिवासी असलेल्या ऐश्वर्या श्योराण यांचे वडील कर्नल अजय कुमार हे 9 व्या तेलंगणा NCC बटालियनचे कमांडिंग ऑफिसर होते.

Aishwarya Shyoran | Sarkarnama

शिक्षण

ऐश्वर्या श्योराण यांचे शिक्षण दिल्लीतील संस्कृती स्कूलमधून झाले. उच्च शिक्षणासाठी दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. याचदरम्यान, त्यांनी मॉडलिंगच्या करियरला सुरुवात केली.

Aishwarya Shyoran | Sarkarnama

फेमिना मिस इंडिया

2014 मध्ये दिल्लीच्या 'क्विन अँड क्लिअर फेस फ्रेश' आणि 2016 मध्ये 'फेमिना मिस इंडिया'ची ऐश्वर्या फायनालिस्ट राहिली आहे.

Aishwarya Shyoran | Sarkarnama

मॉडेलिंग सोडून देत UPSCची तयारी

काही महिन्यानंतर त्यांनी UPSC परीक्षा देण्याच ठरवत त्यांनी मॉडेलिंग हे क्षेत्र सोडून दिलं आणि 10 महिने घरीच परीक्षेची तयारी सुरु केली.

Aishwarya Shyoran | Sarkarnama

पहिल्याच प्रयत्नात यश

UPSC परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत ऐश्वर्या श्योराण यांनी संपूर्ण भारतातून 93 वा क्रमांक मिळवला.

Aishwarya Shyoran | Sarkarnama

सध्या काय करतात?

रँकसह त्यांची नियुक्ती IAS पदासाठी करण्यात आली. सध्या ऐश्वर्या श्योराण या भारतात परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत आहेत.

Aishwarya Shyoran | Sarkarnama

वयाच्या 73 व्या वर्षीही तलवारबाजी,लाठी-काठी; काय आहे गुलाबराव गावंडे यांच्या फिटनेसचे गुपित?

येथे क्लिक करा...