Rashmi Mane
नरेंद्र मोदी नेहमी वेगवेगळ्या गाड्यांमधून प्रवास करताना दिसतात. मोदींच्या ताफ्यांमध्ये आलिशान गाड्यांचा समावेश आहे. PM मोदींना काही सर्वोत्तम कार, कोणत्या ते पाहूयात.
महिंद्रा स्कॉर्पिओ एसयूव्ही ही नरेंद्र मोदींच्या ताफ्यातील एक महत्त्वाची गाडी आहे. कारण मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून भारताचे पंतप्रधान होण्यापर्यंत त्यांनी या कारमधून प्रवास केला होता.
टाटा सफारी ही नरेंद्र मोदींच्या ताफ्यातील अजून एक महत्त्वाची कार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना ही गाडी सर्वाधिक वापरल्या गेलेल्या कारपैकी एक होती.
पंतप्रधानांच्या सुरक्षिततेसाठी अतिशय सक्षम अशी टोयोटा लँड क्रूझर एसयूव्ही मोदींच्या ताफ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. मोदींची सुरक्षितता लक्षात घेऊन या गाडीमध्ये काही बदलदेखील करण्यात आले आहेत. याशिवाय ही कार पूर्णपणे बुलेटप्रूफ आहे.
जगातील सर्वात सुरक्षित कार म्हणून बघितली जाणारी बीएमडब्लू बुलेटप्रूफ कार प्रवाशांना बॉम्बपासून वाचवू शकते आणि 20-इंच टायर पॅक करू शकते, ही कार बुलेटप्रूफदेखील आहे. यात सेल्फ सीलिंग पेट्रोल टाकी आणि त्यासोबत मोदींच्या कारला ऑक्सिजन टाकीदेखील बसवण्यात आली आहे.
रेंज रोव्हर एचएसई या गाडीने BMW ची जागा घेतली आहे. या गाडीमुळे शहरी किंवा ग्रामीण भागातील कोणत्याही रत्यावर अगदी सहजपणे प्रवास करू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातली ही कार आर्मर्ड लक्झरी सलून आहे. या कारची किंमत सुमारे 12 कोटी आहे. या गाडीची रचना अशा प्रकारे केली गेली आहे, की अगदी मोठ्या हल्ल्यालाही तोंड देऊन प्रवाशांना सुरक्षित ठेऊ शकते.