Mayur Ratnaparkhe
पंतप्रधान मोदी सरकारने ११ वर्षांत पायाभूत सुविधांवर सर्वाधिक भर दिला. राष्ट्रीय महामार्गांची लांबी मोठ्याप्रमाणात वाढली आहे.
मागील अकरा वर्षांत रेल्वे मार्गांचाही विस्तार झाला. बहुतांश रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले. न चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन झाल्याने देश काश्मीर ते कन्याकुमीरपर्यंत रेल्वेने जोडला गेला.
शहरी वाहतूक सुधारण्यासाठी, सरकारने मेट्रो सेवा २३ शहरांपर्यंत वाढवली. आता देशातील मेट्रो नेटवर्क एक हजार किलोमीटर पेक्षाही जास्त झाले आहे.
मोदी सरकारने देशात विमानतळांची संख्या ७४ वरून १६० वर नेली आहे. उडान योजने अंतर्गत सवलतीच्या दरात दीड कोटींहून अधिक नागरिकांना स्वस्त दरात विमान प्रवास करण्याची संधी मिळाली.
जलमार्गांवरही चांगले काम झाले, देशात पहिली जल मेट्रो केरळमध्ये सुरू झाली. वाराणसी आणि हल्दिया दरम्या एक अंतर्देशीय जलमार्ग बांधण्यात आला. देशात बंदारांचाही मोठा विकास झाला.
देशाच्या संरक्षण क्षेत्रातीह मागील ११ वर्षांत दमदार कामगिरी झाली. आयएनएस विक्रांत विमानवाहू जहाजे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. देशाची संरक्षण निर्यात ३३ पटीने वाढली आहे
जमीन व आकाशानंतर अंतराळातही सरकारने दमदार कामगिरी केली. इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर सॉफ्ट लँड करून इतिहास रचला. भारताने अंतराळ व्यवस्था खुली केली व आता या क्षेत्रात २०० पेक्षा जास्त स्टार्टअप्स काम करत आहेत.
महिला सक्षमीकरणासाठी सरकारने ९० लाख बचत गटांची स्थापन केली. १० कोटी महिलांना मुद्रा कर्जाचा लाभ मिळाला. दहा कोटी कुटुंबाना उज्ज्वला एलपीजी कनेक्शनचा लाभ मिळाला.
किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमांतून देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू लागली. पिकाच्या किमान आधारभूत किमतीत तब्बल १५० टक्क्यांनी वाढ झाली.
उद्योगांना चालना देण्यासाठी सरकारने ५२ कोटीहून अधिक मुद्रा कर्ज वाटप केले. देशभरात १.६ लाख स्टार्टअप्सची स्थापना, दीड कोटींहून अधिक तरूणांचे कौशल्य विकास, ४९० नवीन विद्यापीठं व आठ हजारांहून अधिक नवी महाविद्यालयं सुरू केली गेली.
अयोध्येतेतील ऐतिहासिक श्रीराम जन्मभूमीवर मंदिर निर्माण झाले. काशी विश्वनाथ ते उज्जैन महाकालेश्वर पर्यंत कॉरिडॉर विकसित केला गेला.