Mayur Ratnaparkhe
जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून जोरदार प्रत्युत्तर दिले. ज्याची दखली संपूर्ण जगाने घेतली. कारण, यानंतर पाकिस्तानला अखेर माघार घ्यावी लागली.
मोदी सरकारने नवा वक्फ कायदा आणला, वक्फ दुरूस्ती विधेयक ३ एप्रिल रोजी लोकसभेत २३२ मतांनी आणि ४ एप्रिल रोजी राज्यसभेत ९५ मतांनी मंजूर झाले.
२०२५च्या केंद्रीय अर्थसंकल्पातून पंतप्रधान मोदींनी मध्यवर्गीयांना मोठा दिलासा दिला. १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर न लावण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने १२ डिसेंबर२०२४ रोजी बहुचर्चित एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकाला मंजुरी दिली.
१८ सप्टेंबर रोजी व्हीनस ऑर्बिटर मिशन (VOM) च्या विकासाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट चंद्र आणि मंगळाच्या पलीकडे शुक्र ग्रहाचा शोध घेणे व त्याचा अभ्यास करणे आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, लडाख या केंद्रशासित प्रदेशात पाच नवीन जिल्हे निर्माण केले जातील. त्यांची नावे झंस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग अशी आहेत
INS अरिघाट ऑगस्ट २०२४ मध्ये विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला.
आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना (AB-PMJAY) अंतर्गत ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांचे उत्पन्न काहीह असो, आरोग्य कवचाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. दरवर्षी पाच लाख रुपयांचे मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळेल.
मोदी सरकारने दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतलेली असतानाच, दुसरीकडे देशांतर्गत शत्रूंचाही नायनाट करण्यासाठी नक्षलवादावरही जोरदार प्रहार केला. २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटण करण्याचा निर्धार केला गेला आहे