Rajanand More
केंद्र सरकारने नुकतचे लेबर कोडबाबत एक नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यामध्ये विविध कायदे एकत्रित करून चार कायदे तयार करण्यात आले आहेत.
नव्या लेबर कोडनुसार तुमच्या महिन्याच्या पगारावर परिणाम होऊ शकतो. काही रिपोर्टनुसार, नव्या नियमानुसार बेसिक पगार, महागाई भत्ता आणि रिटेनिंग अलाऊंस एकत्रित केल्यास हे तुमच्या एकूण पगाराच्या (CTC) कमीत कमी ५० टक्के असायला हवे.
सोप्या भाषेत सांगायचे तर कंपनी तुम्हाला १०० रुपये पगार देत असेल तर त्यापैकी ५० रुपये तुमचा बेसिक पगार असायला हवा.
महिनाअखेरीस हाता येणार पगार थोडाफार कमी होऊ शकतो. कारण तुमचा पीफ आणि ग्रॅच्युटी तुमच्या बेसिक पगारावर अवलंबून असते. बेसिक पगार ५० टक्के झाल्यास त्याप्रमाणात पीएफही कापला जाईल.
बॅंकेत जमा होणार पगार कमी झाला तरी चिंता करण्याची गरज नाही. पीएफचे पैसै तुमच्या पीएफ खात्यात जमा होतील. निवृत्तीवेळी ते तुम्हाला मिळतील.
सीटीसी ७ लाख रुपये असल्यास पूर्वी बेसिक पगार ४० टक्केप्रमाणे २.८० ख रुपये असेल. आता नव्या नियमाप्रमाणे म्हणजे ५० टक्केप्रमाणे बेसिक पगार ३.५० लाख होईल. त्यामुळे हातात येणार वार्षिक पगार सुमारे ११ हजाराने कमी असेल.
पीएफ अधिक कापला जाणार असल्याने तुमची मासिक बचत वाढणार आहे. त्याचा तुम्हाला निवृत्तीवेळी फायदा होईल.
नव्या नियमांमुळे तुमच्या एकूण मासिक पगारावर कोणताही परिणाम होणार नाही. तुम्हाला मिळणारा एकूण पगार पूर्वीप्रमाणेच राहील. कंपनीकडून केवळ पगाराच्या रचनेमध्ये काही बदल केला जाऊ शकतो.