Rashmi Mane
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PMVBRY) पोर्टल आता युवकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पहिली नोकरी मिळालेल्या तरुणांना सरकारकडून 15 हजार रुपयांची थेट मदत दिली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट 2025 रोजी लाल किल्ल्यावरून योजनेची घोषणा केली होती.
या योजनेसाठी केंद्र सरकारकडून तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
1 जुलै 2025 ते 31 जुलै 2027 दरम्यान पहिली नोकरी लागलेल्या तरुणांना सरकारकडून मदत मिळणार आहे.
तरुणांना 2 हप्त्यांमध्ये 15,000 दिले जाणार आहे. DBT मोडने थेट बँक खात्यात पैसे जमा होतील.
नोंदणीसाठी https://pmvbry.epfindia.gov.in किंवा https://pmvbry.labour.gov.in या पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करता येईल.
तसेच ‘उमंग’ अॅपवरही यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) वापरून रजिस्ट्रेशन करता येईल. पहिली नोकरी करणाऱ्या युवकांनी उमंग अॅपवरून UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) तयार करावा लागेल आणि फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजीद्वारे प्रक्रिया पूर्ण करता येईल.
ही योजना श्रम व रोजगार मंत्रालयामार्फत कर्मचारी भविष्य निधी संघटनेद्वारे (EPFO) राबवली जाणार असून उत्पादन क्षेत्रासह विविध क्षेत्रांत रोजगार निर्मितीस चालना मिळण्याची अपेक्षा आहे.