Rashmi Mane
केंद्र सरकारने विमा शुल्कावर लागणारा 18% जीएसटी 5% किंवा शून्यावर आणण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे विमाधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हा बदल आगामी जीएसटी 2.0 मध्ये लागू केला जाणार आहे. विमाधारकांसह अनेक सामान्य ग्राहकांनाही याचा फायदा होईल.
नवीन जीएसटी रचनेत प्रमुख कर श्रेणी फक्त 5% आणि 18% राहतील. त्याचसोबत 40% ची नवीन कर श्रेणी सुद्धा लागू होणार आहे.
मद्य, तंबाखू आणि लक्झरी वस्तू या 40% कर श्रेणीत येणार आहेत, त्यामुळे या वस्तूंवरील कराचा ताण वाढणार आहे.
खाद्यान्न, औषधे, वैद्यकीय उपकरणे, स्टेशनरी, शैक्षणिक साहित्य, केसांना लावण्याचे तेल, टूथब्रश यांसारख्या वस्तूंवरील जीएसटी 0% किंवा 5% केला जाण्याची शक्यता आहे.
टीव्ही, एअरकंडिशनर, फ्रीज यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू 18 % कर श्रेणीत राहतील, ज्यामुळे या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वाहने, हातमागाच्या वस्तू, शेतमाल, कापड, खते आणि हरित ऊर्जेवर आधारित उत्पादनांवर नवीन कर रचनेत विशेष लक्ष दिले जाणार आहे.
खारे पदार्थ, पराठा, बन, केक यांवरील कर सुटसुटीत केला जाईल. हिरे आणि मौल्यवान खड्यांवर 0.25% आणि ज्वेलरीवर 3% कर राहील.