Rashmi Mane
देशातील छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनात आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी केंद्र सरकारने 9 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान किसान मानधन योजना (PM-KMY) सुरू केली
या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 60 वर्षांच्या नंतर दरमहा 3,000 पेन्शन दिली जाते.
वृद्धापकाळात शेतकऱ्यांना दरमहा 3000 पेन्शन मिळावी रोजच्या गरजांसाठी कोणावरही अवलंबून राहावे लागू नये. शेतकऱ्यांचे भविष्य शाश्वत आणि सुरक्षित राहावे यासाठी ही योजना राबण्यात येत आहे.
शेतकऱ्यांचे वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असलेले लघु आणि सीमांत शेतकरी यासाठी पात्र आहेत. दरमहा फक्त 55 ते 200 इतका प्रीमियम भरावा लागतो. 60 वर्षांनंतर सुरू होईल पेन्शन.
सरकारी/निमसरकारी नोकरीधारक
NPS, EPF, ESIC योजनेत समाविष्ट
डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सीए, आर्किटेक्ट
संस्थात्मक शेतजमिनीधारक
आयकर भरलेले अर्जदार
आधार कार्ड
बँक पासबुक
शेतजमिनीचे दस्तऐवज
पासपोर्ट साइज फोटो
ऑटो डेबिट फॉर्म
या योजनेत अर्ज करण्यासाठी जवळच्या CSC केंद्रात जाऊन अर्ज करता येते. यासाठी आधार बँक खात्याशी जोडलेले असावे. एकदा नोंदणी झाल्यावर नियमित हप्ते ऑटो डेबिट होतात.
या योजनेत पैसे गुंतवल्यास 60 वर्षांनंतर दरमहा 3000 पेन्शन मिळणार. यासाठी स्त्री आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात.