Modi Sri Lanka Visit 2025 : मित्र विभूषण सन्मान, स्वातंत्र्य चौकात ऐतिहासिक सलामी अन् द्विपक्षीय चर्चा!

Mayur Ratnaparkhe

श्रीलंका दौरा -

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. राजधानी कोलोंबो येथे मोदींचे जोरदार स्वागत झाले.

विशेष स्वागत -

श्रीलंकेच्या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदींचे स्वातंत्र्य चौकात विशेष स्वागत करण्यात आले.

मित्र विभूषण -

श्रीलंकेने पंतप्रधान मोदींना देशाचा सर्वोच्च सन्मान मित्र विभूषण देऊन सन्मानित केले आहे.

गार्ड ऑफ ऑनर -

श्रीलंकेने अद्याप कोणत्याही नेत्याला औपचारिक गार्ड ऑफ ऑनर दिलेला नाही, पण मोदींना हा सन्मान मिळाला.

भारताची ताकद-

यावरून स्पष्ट होते की संपूर्ण जग भारताच्या ताकदीची कबुली देत ​​आहे.

सर्वोच्च सन्मान -

मित्र विभूषण पुरस्कार हा श्रीलंकेतील परदेशी नेत्यांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे.

ई-उद्घाटन -

दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे कृषी क्षेत्रातील उच्च प्रभाव समुदाय विकास प्रकल्पाचे ई-उद्घाटन केले.

द्विपक्षीय चर्चा -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी शनिवारी कोलंबो येथील राष्ट्रपती सचिवालयात द्विपक्षीय चर्चा केली.

महत्त्वाचे करार -

दोन्ही बाजूंनी संरक्षण सहकार्य आणि ऊर्जा केंद्र म्हणून त्रिंकोमालीचा विकास यासह अनेक महत्त्वाचे करार करण्यात आले.

Next : पोलिस महिला अधिकाऱ्याच्या हत्याकांडात बडतर्फ पीआय कुरूंदकर दोषी, कोण होत्या अश्विनी बिद्रे

Ashwini Bidre | sarkarnama
येथे पाहा