International Yoga Day 2025: मोदी, शहांपासून ते फडणवीस, शेलारांपर्यंत सर्वांनीच केला योगाभ्यास!

Mayur Ratnaparkhe

पंतप्रधान मोदींचा योग सराव

आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे पंतप्रधान मोदींनी सामूहिक योगासने कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

PM Modi | sarkarnama

अमित शहांचा अहमदाबादेत योग सराव -

मन, शरीर आणि मेंदूमध्ये एकता आणणारा 'योग' हा जगभरातील लोकांच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनला आहे. असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये त्यांनी योगाचा सराव केला.

amit Shah | sarkarnama

गडकरींचा धंतोलीत योगाभ्यास -

११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागपूरच्या धंतोली येथील यशवंत स्टेडियममध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी योगासने केली.

Nitin Gadkari | sarkarnama

उधमपूरमध्ये राजनाथ सिंह -

उधमपूर येथील नॉर्दर्न कमांड मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सहभागी झाले होते.

Rajnath Singh | sarkarnama

निर्मला सीतारामन फरीदाबादेत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन फरीदाबाद येथील अरुण जेटली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट (AJNIFM) येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

Nirmala sitaraman | sarkarnama

'शरीरमाद्यम खलु धर्मसाधनम'

योग हा भारतातील ऋषी परंपरेचा एक मंत्र आहे, जो आपल्याला निरोगी शरीरासोबतच निरोगी मन देखील देतो, असं मुख्यमंत्री योगींनी म्हटलं आहे.

CM yogi | sarkarnama

समत्वं योग उच्यते

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, जागतिक शांती आणि सौहार्दासाठी लाल किल्ल्याच्या परिसरात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यापीठाने आयोजित केलेल्या सामूहिक योगसाधनेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भाग घेतला.

om birla | sarkarnama

मुख्यमंत्री फडणवीस अन् ‘वारकरी भक्तीयोग’–

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे येथे जागतिक योग दिनानिमित्त तन-मन-आत्मा यांचे संतुलन साधणारा ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्यांनी हजारो वारकऱ्यांना संबोधित केले.

devendra Fadnavis | sarkarnama

चंद्रकांतदादांचा योगाभ्यास

पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात अलौकिक भक्तीयोग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वारकऱ्यांसह मंत्री चंद्रकांत पाटील यांनी योगासने केली.

chandrakant patil | sarkarnama

योग करा निरोगी रहा  - आशिष शेलार

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंत्री आशिष शेलार यांनी साने गुरुजी सभागृह, सांताक्रूझ येथे आयोजित केलेल्या योग कार्यक्रमात उपस्थित राहून, नागरिकांसोबत योग साधना केली आणि सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Ashish Shelar | sarkarnama

Next - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कोणती गाणी आवडतात? फेव्हरेट गाणं कोणतं?

CM Devendra Fadnavis | Sarkarnama
येथे पाहा