PM Modi : गांधी टोपी अन् गळ्यात उपरणं घातलेल्या मोदींच्या लुकची सर्वत्र चर्चा!

Mayur Ratnaparkhe

महायुतीच्या दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा झाली.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी झालेली ही सभा एका वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय ठरली.

याप्रचारसभेस आलेल्या मोदींनी भाषण करताना गांधी टोपी आणि गळ्यात उपरण घातलं होतं.

नाशिकमधील महायुतीच्या सर्वच प्रमुख नेत्यांची सभेस उपस्थिती होती.

यावेळी मोदी आणि छगन भुजबळ यांच्यातही वैयक्तिक चर्चा झाली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आक्रमक भाषण करत विरोधकांवर टीका केली.

तर छगन भुजबळ यांनीही त्यांच्या खास शैलीत भाषण करून उपस्थितांची मनं जिंकली.

फडणवीस आणि भुजबळ या दोन्ही नेत्यांनी मंचावर हस्तांदोलन केले.

या प्रचारसभेस नागरिकांचाही मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

NEXT : नरेंद्र मोदी आणि छगन भुजबळ यांच्यात नेमकी काय चर्चा?