Jagdish Patil
सध्या राज्यभरात 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यच्या एन्काऊंटर प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
रोहितने या मुलांना ऑडिशनच्या नावाखाली पवईतील एका स्टुडिओमध्ये बोलवून त्यांना ओलीस ठेवल्याचं समोर आलं आहे.
त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला. मात्र, या घटनेनंतर आता त्याने हे चुकीचं पाऊल का उचललं? याबाबतची माहिती समोर आली आहे.
वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे सरकारच्या काळात रोहितने एका योजनेचं काम केलं होतं. या कामाचे 2 कोटी रुपये सरकारने थकवल्याचा त्याने आरोप केला होता.
हे पैसे मिळावे यासाठी त्याने उपोषणही केलं होतं. मात्र, त्याला सरकारने योग्य प्रतिसाद न दिल्याने रोहित प्रचंड नैराश्यात होता.
सरकारने शाळांचा सर्वांगीण विकास, आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यासाठी 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' ही योजना 5 डिसेंबर 2023 रोजी सुरू केली होती.
याच योजनेतंर्गत रोहितने 'स्वच्छता मॉनिटर' हा उपक्रम राबवला होता. ज्यासाठी त्याने स्वत:चे घर विकले मात्र उपक्रम पूर्ण झाल्यानंतर सरकारने त्याला पैसे दिले नाहीत.
त्यामुळे रोहितने तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात उपोषणही केलं. मात्र, त्यांनी केवळ आश्वासन दिल्याचं सांगितलं जात आहे.
तर रोहित आर्य याला एक मुलगा असून त्यांची पत्नी एका बँकेत मोठ्या पदावर कामाला आहे.