सरकारनामा ब्यूरो
मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री मोहन यादव यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मोहन यादव हे मध्य प्रदेशचे 19 वे मुख्यमंत्री आहेत.
या सोहळ्यात उपमुख्यमंत्री जगदीश देवडा आणि राजेंद्र शुक्ला यांनीही शपथ घेतली.
मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांच्या हस्ते शपथ देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनाही पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मोहन यादव यांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा आणि 11 राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
भोपाळ येथील नेहरू स्टेडियमवर दोन हजार लोकांमध्ये हा भव्यदिव्य सोहळा पार पडला.