Rajanand More
मध्य प्रदेशातील 16 वर्षे वयाच्या मोनालिसा भोसलेच्या व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल झाले. तिच्या निखळ सौंदर्याची खूप चर्चा झाली. तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी होत होती. ‘महाकुंभ मेळा गर्ल’ अशी नवी ओळख तिला मिळाली.
मुंबई आयआय़टीमध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या अभय सिंगचीही खूप चर्चा झाली. त्याचा धर्मप्रसाराला वाहून घेण्यापर्यंतच्या प्रवासाचे कौतुक झाले. आयआयटी बाबा म्हणून सोशल मीडियात व्हायरल झाले.
योगगुरू रामदेव बाबा यांचाही एक व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. यामध्ये ते गंगेत डुबकी घेताना त्यांचे केस फिरवताना त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या साधूंना हे केस लागतात. अभिनेत्री हेमा मालिनी यांना हसू अनावर झाल्याचे व्हिडीओत दिसते.
नव्वदीतील प्रसिध्द अभिनेत्री ममता कुलकर्णीचे व्हिडीओही व्हायरल झाले. कुंभमध्ये तिची महामंडलेश्वर म्हणून झालेली नियुक्ती वादग्रस्त ठरली. प्रचंड विरोधानंतर तिला हटवण्यात आले.
कुंभमेळ्यात येऊ न शकलेल्या पतीला व्हिडीओ कॉल करत चक्क मोबाईल नदीच्या पाण्यात बुडवलेल्या महिलेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.
कंटेट क्रिएटर शुभम प्रजापतनेही लक्ष वेधून घेतले होते. त्याने चहा विक्रीतून एका दिवसांत 5 हजार रुपये कमावले होते. त्याच्या या संपूर्ण प्रवासाचा व्हिडीओही हिट ठरला.
हॅरी पॉटरसारखा दिसणारा एक व्यक्तीही कुंभमेळ्यात दिसून आला होता. मेळ्यामध्ये प्रसाद खातानाचा त्याचा व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मीडियात व्हायरल झाला होता. ती व्यक्ती नेमकी कोण, हे स्पष्ट झालेच नाही.
प्रयागराजमधील वाहतूक कोंडीचे व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाले. एका व्हिडीओमध्ये तर भाविकांनी बसच्या छतावर बसून पत्त्यांचा डाव मांडल्याचे दिसत होते.
एका वृध्द व्यक्तीचा पत्नी तीनदा हरवल्याचे सांगतानाच्या व्हिडीओलाही पसंती मिळाली. पत्नी तीनदा हरवली पण पोलिसांनी शोधून दिले, असे सांगत त्यांनी मेळ्यातील व्यवस्थापनाचे कौतुक केले होते.