Indrajit Sawant : ब्राह्मणद्वेष पसरवल्याचा आरोप अन् जीवे मारण्याची धमकी, सध्या चर्चेत असलेले इंद्रजीत सावंत नेमके कोण?

Jagdish Patil

ब्राह्मणद्वेष

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना ब्राह्मणद्वेष पसरवत असल्याचा आरोप करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Indrajit Sawant | Sarkarnama

धमकी

नागपूर येथील प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने धमकी दिल्याचा दावा सावंत यांनी फेसबुक पोस्टमध्ये केला आहे.

Indrajit Sawant | Sarkarnama

इंद्रजीत सावंत

तर धमकीचा फोन आल्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणारे इंद्रजीत सावंत नेमके कोण आहेत हे जाणून घेऊया.

Indrajit Sawant | Sarkarnama

इतिहास संशोधक

इंद्रजीत सांवत हे कोल्हापुरचे रहिवासी असून ते इतिहास अभ्यासक आणि संशोधक आहेत.

Indrajit Sawant | Sarkarnama

शिक्षण

सावंत यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर येथून पुरातत्व, तर शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरातून इतिहास विषयाची पदवी मिळवली आहे.

Indrajit Sawant | Sarkarnama

पुरस्कार

त्यांना राजर्षी शाहू गौरव पुरस्कार, शिव-सह्याद्री ट्रस्ट, पुणे यांच्याकडून संशोधनासाठी शिष्यवृत्ती, छत्रपती शंभूराजे गौरव आणि छत्रपती संभाजी महाराज असे विविध राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.

Indrajit Sawant | Sarkarnama

लेखन

इंद्रजीत सावंत यांनी शिवगर्जना, नरशार्दुल राजा संभाजी, गाथा छत्रपतींची, राजर्षी शाहू छत्रपती अशा ऐतिहासिक नाटकांसाठी लेखन केलं आहे.

Indrajit Sawant | Sarkarnama

तज्ञ इतिहासकार

तसंच त्यांनी स्वराज्यरक्षक संभाजी, जय भवानी, जय शिवाजी अशा ऐतिहासिक मालिकांसाठी त्यांनी तज्ञ इतिहासकार म्हणून मार्गदर्शन केलं आहे.

Indrajit Sawant | Sarkrnama

सदस्य

रायगड विकास प्राधिकरण येथे राज्य सरकारने त्यांची तज्ञ इतिहासकार म्हणून नियुक्त केली आहे. तसंच ते अनेक सरकारी आणि निमसरकारी समित्यांचे सदस्य आहेत.

Indrajit Sawant | Sarkarnama

NEXT : धाडसी निर्णय..! अवघं 3 महिन्यांचं बाळ असताना दिली यूपीएससी

IPS Poonam Dalal | Sarkarnama
क्लिक करा