ट्रम्प यांच्या आवाहनाला केराची टोपली; अमेरिकेचा थेट NATO ला इशारा, किती देशांना पडणार महागात?

Jagdish Patil

स्ट्रेट ऑफ होर्मुझ

डोनाल्ड ट्रम्प यांनी 'नाटो'तील देशांना स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले होते.

Strait of Hormuz | Sarkarnama

डोनाल्ड ट्रम्प

मात्र स्पेन, ब्रिटनसह अनेक देशांनी अमेरिकेच्या भूमिकेला पाठिंबा न दिल्याने ट्रम्प यांनी 'नाटो'तून बाहेर पडण्याचा इशारा दिला.

Donald Trump | Sarkarnama

अमेरिका

अमेरिकेने नाटोमधून बाहेर पडावे का? याचा विचार करत असून एकदा निर्णय घेतला तर पुन्हा मागे फिरणार नसल्याचं ट्रम्प म्हणाले.

Donald Trump | Sarkarnama

NATO

याच पार्श्वभूमीवर उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) संघटनेबाबतची माहिती जाणून घेऊया.

NATO member countries, | Sarkarnama

स्थापना

नाटोची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी झाली असून ती एक आंतरराष्ट्रीय लष्करी युती आहे.

NATO member countries, | Sarkarnama

मुख्य कार्यालय

12 देशांनी मिळून सुरुवात केलेल्या नाटोचे मुख्य कार्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम येथे आहे.

NATO member countries, | Sarkarnama

सदस्य

प्रामुख्याने युरोप आणि उत्तर अमेरिकेतील देशांचा समावेश असलेल्या नाटोतील सदस्य देशांची संख्या 32 आहे.

NATO | Sarkarnama

हल्ला

नाटोतील एखाद्या देशावर हल्ला म्हणजे सर्वांवर हल्ला, असे मानले जाते.

NATO | Sarkarnama

मान्यता

एखाद्या मोठ्या निर्णयासाठी किंवा नवीन सदस्याचा समावेश करण्यासाठी सर्व 32 देशांची मान्यता आवश्यक असते.

NATO-member-countries | Sarkarnama

युक्रेन

स्वीडन हा नाटोचा 32 वा सर्वात नवीन सदस्य आहे तर युक्रेन, जॉर्जियासारखे देश सदस्य होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

ukraine | Sarkarnama

NEXT : बारामतीत काँग्रेसने उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? वडील होते आमदार, शरद पवारांना दिलं होतं आव्हान

Akash More Congress Candidate | Sarkarnama
क्लिक करा